दौरे पे दौरा … अभ्यास मात्र शून्य ; केडीएमटीची सेवा स्मार्ट करण्याची मागणी  

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – कल्याण- डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट होईल का असा प्रश्न  नागरिकांना पडत असताना येथील परिवहन सेवा स्मार्ट होण्यासाठी खूप वर्ष लागतील असे दिसत आहे. मात्र परिवहन समिती सभापती आणि सदस्य  परिवहन सेवेची माहिती घेण्यासाठी दौरे पे दौरा … करत आहेत. याचा फायदा येथील परिवहन सेवेला होत नसल्याने परिवहन समिती सभापती आणि सदस्यांचा अभ्यास शून्य झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. केडीएमटीची सेवा स्मार्ट करण्याची मागणी कल्याण-डोंबिवलीकर करत आहे.

 

 दीड महिन्यापूर्वी परीवहन समिती सभापती संजय पावशे यांसह सदस्य  सिक्कीमची राजधानी गंगटोक येथील परिवहन सेवेची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौऱ्याला गेले होते. त्यानंतर १४ फेब्रुवारीला नवी मुंबईला जाऊन तेथील स्मार्ट परिवहन सेवेची माहिती घेतली. मात्र संगणीकृत परिवहन सेवेची माहिती घेऊन त्यांचा फायदा आपल्याकडील परिवहन सेवेला कसा होऊ शकतो यांनी आखणी अद्याप झाली नाही. नवी मुंबईत सुमारे ४०० परिवहन बसेस रस्त्यावर धावतात. नवी मुंबईतील परिवहन समिती सभापती अनेक वर्षापासून राष्ट्र्वादिकडे आहे.  येथील परिवहन उपक्रमाची दिवसाला सुमारे २८  लाख रुपये उत्पन्न आहे. तसेच येथील प्रशासनाचा पाठींबा मिळत असून आर्थिक दुष्ट्या समक्ष आहेत असे सदस्य संतोष चव्हाण आणि संजय राणे यांचे म्हणणे आहे. नवी मुंबईतील परिवहन सभापती प्रदिप गवस यांनी सेवेची माहिती दिली. नवी मुंबईतील परिवहन बसेस मध्ये जीपीआर सिस्टम बसविण्यात आले असून त्यामुळे बसचालक बसेसचा गती किती ठेवतो , बस कुठल्या बसस्थानकावर आली आहे यांची माहिती कंट्रोल रूम मध्ये मिळत असते. विशेष म्हणजे येथे शिस्तीला महत्व दिले जाते. तेथील डेपो सिमेंटकॉंक्रीटचे बनविले आहेत. यामुळे आजहि येथील परिवहन सेवा उत्तम चालली आहे असे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली परिवहन सेवेस नवसंजीवनी मिळावी या उद्देशाने परिवहन समिती सभापती व सदस्य आणि प्रशासनातील काही अधिकारी वर्ग मिळून नवी मुंबई परिवहन सेवेचा कारभार कसा चालतो ह्याबाबत दौरा केला असला तरी याचा फायदा कितपत मिळणार हे लवकरच समजेल. याबाबत पालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी कल्याण- डोंबिवलीतील परिवहन सेवा उत्तम करावी अशी मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये नसल्याचे सांगितले. 

 एनएमएमटी ट्रकर मोबाईल अॅप आणि टोल फ्री नंबर …  

  नवी मुंबई परिवहन सेवेने  एनएमएमटी ट्रकर मोबाईल अॅप  तयार केले आहे. प्रवासाला जिथे जायचे आहे त्या ठिकाणची बस कुठे आहे ,बस थांब्यावर येण्यास किती वेळ लागेल याची माहिती नकाश्यातून मिळते. प्रवाशाला जर परिवहन सेवेविषयी सूचना अथवा तक्रार करायची असेल तर येथील परिवहन व्यवस्थेने  टोल फ्री नंबरहि  दिला आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email