दोन वर्षापूर्वी पलायन केलेले सैराट जोडपे नाशिकमध्ये जेरबंद

(म.विजय)

बीड – दोन वर्षांपूर्वी बीडमधून पलायन केलेल्या सैराट जोडप्यास काल नाशिकमधील सातपूर परिसरात जेरबंद करण्यात आले.

ही कारवाई बीड पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने केली.

सावित्री व प्रदीप (नावे बदलेली आहेत) हे दोघेही एकाच गल्लीत राहत होते. सावित्रीची आई किरायाच्या घरात राहून धुणीभांडी करते. त्यांच्या शेजारीच प्रदीप राहत होता. एकाच गल्लीत राहत असल्याने त्यांच्यात ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत व पुढे प्रेमात झाले.

५ डिसेंबर २०१६ रोजी सावित्रीची आई धुणीभांडीसाठी बाहेर गेली. हीच संधी साधून प्रदीपने सावित्रीला घेऊन बीडमधून पलायन केले. सावित्रीच्या आईने सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. याच दरम्यान प्रदीपही गायब झाल्याने संशय बळावला. सावित्रीच्या आईने बीड शहर पोलीस ठाणे गाठत प्रदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहर पोलिसांनी सुरुवातीला तपास केला. त्यानंतर २९ जून रोजी हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे वर्ग करण्यात आले. त्यांनी या सैराट जोडप्याची माहिती काढली असता ते नाशिकमध्ये सातपूर येथे असल्याचे समजले. काल त्यांनी सापळा लावत दोघांनाही सातपूर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, पो. उप नि. दिपाली गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. भारत माने, लिलावती खटाणे, शेख पाशा, मीना घोडके, विकास नेवडे यांनी केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email