दोन युवाकांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे जखमी घुबडाला मिळाले उपचार

कल्याण -कल्याण पूर्व महात्मा फुले नगर येथील सूचक नाका विभागत  एका भंगारच्या दूकानात  घुबड शिरले.हे घुबड फारच जखमी व घाबरलेल्या अवस्थेत होते व त्याला पहायला लोकांनी गर्दी केली होती. कल्याण पूर्व सूचक नाका येथील मनोज वाघमारे व गणेश वाघमारे यांनी हे दृष्य पाहताच त्यांना त्या पक्षाची दया आली व त्यांनी पुढाकार घेवुन त्या घुबडाला पकडलं. हे घुबड फारच जखमी व घाबरलेल्या अवस्थेत होते . एका पत्रकाराच्या  सल्ल्यानुसार  मनोज वाघमारे  व गणेश वाघमारे यांनी जखमी घुबडाला  वन विभागाच्या सुपूर्त केलं.पतंगाच्या मांज्यामुळे ते जखमी झाल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला .दरम्यान या दोन युवाकांनी दाखवलेल्या या माणुसकी बद्दल त्यांच सर्वत्र कौतुक होत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email