दोन महिलेसह एका तरुणाचा मोबाईल व रोकड लंपास – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.२७ – डोंबिवलीत भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला असून गर्दीच्या वर्दळीच्या रस्त्यावर नागरिक विशेषतः महिलांचे खरेदी करताना व्यस्त असल्याची संधी साधत हातचलाखीने त्याच्या कडील मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना वाढल्या आहेत. बुधवारी सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर समोरील भाजी मार्केट मध्ये एक महिला ,नीलम म्हात्रे नावाची महिला व सचिन कोकितकर सामान खरेदी करत असताना सदर महिलेचे मोबाईल फोन व रोख रक्कम, नीलम म्हात्रे यांचे ६०० रुपये रोकड ,सचिन यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने हातचलाखीने चोरून नेला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आह
Please follow and like us: