दोन ठिकाणी जुगाराच्या अड्डयांवर छापा

अंबरनाथ-अंबरनाथ पोलिसांनी दोन वेगवेगळया ठिकाणी पर छापा मारून करीब १५ जुगा-यांना अटक केली आहे.यातला पहीला छापा अंबरनाथ पोलिसांच्या हद्दीत तर दूसरा छापा शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मारण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पोलिसांनी विमको गावदेवी नजीकच्या हनसा बिल्डिंगच्या समोर सार्वजनिक रोडवर चालु असलेल्या जुगाराच्या अड्डयावर छपा मारला.दुपारी 2 वाजता मारण्यात आलेल्या या छाप्याच्या वेळी तेथे असलेले काही जुगारी पळुन गेले तर मटका चालवणारा दिलीप मोरे, केतन सावंत, परशुराम गंटी,हनीफ कातिल  व सुतार कुट्टी आशा ५ जणांना पोलिसांनी अटक केली.सदर प्रकरणी पुढील कारवाई पोलीस उपनिरक्षक आर जे शेटे करत आहेत.शिवाजी नगरच्या एकता नगरमधे ७ फेब्रुवारीला संद्याकाळी मारलेल्या छाप्यात अशोक शिंदे ,रमेश केणे , अक्षय गुप्ता, विजय इंगळे, मोइनुद्दीन खान, संतोष धाभाडे, मलावा चौगले, विलास नागदेव, मंगेश पाटिल व अन्य दोन जुगारी, असे एकुण १० जुगा-यांना पकडुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी पुढील करवाई पोलीस हवलदार यू राजपूत करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email