देशातल्या सर्व रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासी गाड्यांमध्ये आपात्कालीन प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध 

नवी दिल्ली, दि.२५ – रेल्वे मंत्रालय, देशातल्या सर्व रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासी गाड्यांमध्ये आपात्कालीन प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. या प्रथमोपचार पेटीमध्ये विविध प्रकारची औषधं, जखमेवर मलमपट्टी करण्याचे साहित्य, ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर साहित्याचा समावेश आहे. रेल्वे अधिक्षक, गार्ड, स्टेशन मास्टर आणि स्थानक अधिक्षक यांच्याकडे हे साहित्य उपलब्ध असेल. दिल्लीतल्या एम्समधल्या तज्ञ डॉक्टरांनी या साहित्याची शिफारस केलेली आहे.

प्रवासादरम्यान एखादा प्रवासी आजारी पडल्यास अथवा जखमी झाल्यास त्यावेळी तैनात असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याशी संपर्क साधून प्रथमोपचार साहित्याची व्यवस्था या कर्मचाऱ्याकडून करता येऊ शकणार आहे. तिकिट तपासनीस, रेल्वे अधिक्षक, गार्ड आणि स्टेशन मास्टर यांना प्रथमोपचार देण्याविषयी प्रशिक्षित करण्यात आले आहे. गंभीर स्वरुपाची वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास प्रवास करणाऱ्या डॉक्टरांची सेवा घेतली जाऊ शकते अशा डॉक्टरांची आरक्षण तक्त्यात वेगळी नोंद दर्शवली जाते तसेच त्यांना तिकिटात सूटही दिली जाते संबंधित स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरातल्या रेल्वे, सरकारी, खाजगी दवाखान्यांची आणि रुग्णवाहिका सेवांची यादी, त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील असणारी यादी स्टेशन मास्टरांकडे उपलब्ध राहील.  

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email