दूध,अन्न,औषधे, खाद्यपदार्थ तक्रारींवर कार्यवाही,१३ एप्रिल रोजी ग्राहक मार्गदर्शन कॅम्प

ठाणे – ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कन्झुमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट,भारतीय ग्राहक मार्गदर्शक संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा कॅम्पचे आयोजन  १३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत  नियोजन भवन सभागृह  ,पहिला मजला ,जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे करण्यात आले आहे . नागरिकांनी ग्राहक मेगा कॅम्पला मोठ्या संख्येने उपस्थीत राहून त्यांचे समस्यांचे निराकरण या शिबिरातून करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे .

          या मेगा कॅम्पमध्ये ग्राहकांना असणाऱ्या तक्रारी ,दुध ,अन्न ,औषधे, खाद्य पदार्थ यामध्ये होणारी भेसळ आणि वजनमापातील फरक अशा प्रकारच्या असंख्य ग्राहकोपयोगी गोष्टीचे योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे . ग्राहकांची  कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यावर तक्रारीचे निवारण कसे करतात ,त्याचप्रमाणे लहान बचत सुरु करून पुढे गुंतवणूकदार कसे बनावे याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे .

या कार्यशाळेमध्ये आपल्याजवळील बचतीचे लवकर गुंतवणूकीचे व्यवस्थापन कसे करावे यावर योग्य मार्गदर्शन करण्यात येते .उदा. वित्तीय संकल्पना आणि धोरण, वित्तीय उत्पादने , म्यूच्युअल फंड आणि शेअर्स मधील फरक , चांगली योजना कशी निवडावी . आयुर्विमा किंवा वैद्यकीय विमा कसा घ्यावा इत्यादी .

       कार्यशाळेत दुध परिक्षणयंत्र आणि त्याचे दुधाचे परिक्षण करून अहवाल दुध आणणाऱ्या व्यक्तीस ४० सेकंदात दिला जातो. कार्यशाळेत येणाऱ्या सर्व तक्रारीची छाननी करून तक्रारदाराची तक्रार त्या विषयातील तज्ञ सभासद समजून घेऊन ती तक्रार संबंधीत विभागाकडे स्पीड पोष्टाने पाठवून तक्रारीचा पाठपुरावा केला जातो.

शिबिरामध्ये येणाऱ्या तक्रारी

शेतीसाठी  शासनाने पुरविलेले सोलर आणि पंप न मिळणे, घराच्या बांधकामाचे योग्य पैसे भरून सुद्धा बांधकाम व्यावसायिक ताबा देण्यात टाळाटाळ करत असल्यास, बँकेचे कर्जाचे हप्ते भरून सुद्धा सतत बँकेचे पत्रक मिळणे, वैद्यकीय विम्याचे पैसे न मिळणे किवा त्यामध्ये कपात करणे, नवीन घेतलेल्या दागिन्यांमध्ये नमूद केलेली शुद्धता नसणे,  वीज वापराचे मीटर योग्यप्रकारे न चालणे त्याची तक्रार करूनसुद्धा दखल न घेणे, मोबाईल कॉम्प्युटर घरगुती वीज उपकरणे हमी दिलेल्या कालावधीत बिघडणे,परंतु त्याची दखल उपकरण बनविणारी कंपनी घेत नाही . छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत वस्तू विकणे अशा तक्रारींवर मार्गदर्शन केले जाईल.

ग्राहक मार्गदर्शन शिबिरामध्ये असे व्हा सहभागी

या कॅम्पमध्ये  सामील होण्यासाठी राज्य शासनातर्फे भारत ग्राहक मार्गदर्शन संस्थेची हेल्पलाईन टोल फ्री असून त्यांचा क्रमांक १८००२२२२६२ असा आहे. ही सेवा सकाळी १० सायंकाळी ५ वाजेपर्यंत असते. mah.helpline@gmail.com या ईमेलद्वारे आणि मोबाईल क्र ९७७३३३६४०० यावरती SMS मार्फत तक्रार करता येते. संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर सुद्धा लिखित तक्रार स्वीकारल्या जातात .

ग्राहकांच्या तक्रारीची नोंदणी झाल्यावर संबंधीत ठिकाणी पत्रव्यवहार करण्यासाठी तक्रारदाराकडून १५० रुपये शुल्क आकारले जाते .ग्राहकांचे तक्रार पत्र संबंधीत ठिकाणी पाठविल्यानंतर काहीच उत्तर न आल्यास साधारणतः २० दिवसानंतर एक स्मरणपत्र पाठवून तक्रारीचा पाठपुरावा केला जातो. काही वेळेस तक्रारदारास आणि ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे अशा दोघांनाही संस्थेत आमंत्रित करून समस्या समोरासमोर समोर सोडवल्या जातात अशी  माहिती  जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांच्याकडून कळविण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email