दुसर्याच्या कामाचे श्रेय घेण्याआधी खड्डयात गेलेल्या ठाण्याला बाहेर काढा, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांचा टोला
ठाणे – आत्माराम पाटील चौक ते कळवा आणि विटावा खाडीवरील समांतर खाडीपूल या साठी आ. जितेंद्र् आव्हाड यांनीच विधानसभेत आवाज उठवला होता. त्यामुळे हे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना कोणीही त्याचे श्रेय घेऊ नये; लोकसभेचे सदस्य असलेल्यांनी केंद्रातून शहरासाठी एखादी चांगली योजना आणावी; दुसर्याच्या कामाचे श्रेय घेण्याआधी खड्डयात गेलेल्या ठाण्याला बाहेर काढा, असा टोला विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी खा.श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे.
नवी मुंबईहून ठाण्याकडे जाणार्या वाहनांना कळव्याला अनावश्यक वळसा घालावा लागतो. यामुळे कळवा, खारेगाव, कळवा पुल येथे वाहतूक कोंडी होते. यावर उतारा म्हणून विटावा ते ठाणे स्थानक असा हलक्या वाहनांसाठी रेल्वेला समांतर खाडीपूल बांधण्याची मागणी सर्वात आधी आमचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. अनेकवेळा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करुन तो मंजूर करुन आणला आहे. त्यासाठीचा निधीदेखील आ. जितेंद्र आव्हाड यांनीच मिळवला आहे., असे असतानाही खा. श्रीकांत शिंदे यांनी श्रेय घेण्याचा जो केवीलवाणा प्रयत्न केला आहे.
त्याची आपणाला किव येते. दिल्लीतून एखादी चांगली योजना शहरासाठी आणणे खासदारांना शक्य होत नाही. त्यामुळेच ते कर्तव्यतत्पर असलेल्या आमच्या आमदारांचे श्रेय लाटत आहेत. हे श्रेय लाटण्याआधी ज्या शहरात सत्ता उपभोगत आहेत. त्या शहरामध्ये पडलेले खड्डे बुजवण्याचे काम करा, असा उपरोधीक टोला मिलींद पाटील यांनी लगावला आहे.