दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरणे या ठिकाणी पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश

ठाणे दि.१२ – पावसाळ्यात जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पर्यटन स्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघात होतात व पर्यटकांना जीव गमवावे लागतात हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलै पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जरी केले आहेत.

ठाणे तालुक्यातील येऊर, येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपास वरील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा; कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, सुभेदार वाडा, गणेश घाट चौपाटी; मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली गोरखगड, सिंगापूर नाणेघाट, धसई धरण, आंबेटेंबे मुरबाड; भिवंडी तालुक्यातील नदी नाका, गणेशपुरी नदी परिसर; शहापूर तालुक्यातील भातसा धरण स्थळ,कुंडन, दहीगाव, माहुली किल्ला, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत, सापगाव नदी, कळंबे नदी किनारा

या सर्व ठिकाणी १ किमी परिसरात पर्यटकांना धबधब्यावर जाणे, खोल पाण्यात उतरणे, दरीचे कठडे धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे, मद्य बाळगणे, मद्यधुंद होऊन याठिकाणी प्रवेश करणे, या सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड, टिंगल टवाळी,, मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, धबधब्याच्या परिसरात दुचाकी, चार चाकी, सहाचाकी वाहने घेऊन येणे, ध्वनी, वायू, जल प्रदूषण करणे अशा बाबीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

हा आदेश ३१ जुलैपर्यंत लागू राहील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email