दुभाजकवर आदळून गाडी झाली पलटी, महिला ठार

नगर – रस्त्याच्या दुभाजकाला गाडी आदळून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघात नगर- संभाजीनगर रोडवर पांढरीपूल येथे झाला आहे. तसेच या गाडीतील लोक पाथर्डीवरून कायगाव टोकाच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका हॉटेलसमोर असलेल्या रस्त्याच्या दुभाजकावर त्यांची गाडी वेगाने आदळली. या अपघातात गाडीतील उज्ज्वला गोरे व अनिता गोरे या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर बाबासाहेब गोरे आणि निलेश गोरे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email