दुप्पट परताव्याचे आमिष दाखवत दाम्पत्याने घातला कोट्यवधीचा गंडा
कल्याण -एका दाम्पत्याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत कल्याण डोंबिवलीतील अनेकांना मिळून एक कोटी 3 लाख 70 हजारांना गंडा घातल्याची घटना उजेडात आली आहे या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी रवींद्र गावंडे व अनिता गावंडे विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
कल्याण पूर्वेकडील लक्ष्मी बाग परीसारतील सुशीला इमारती मध्ये राहणारे अनिता गावंडे व रवींद्र गावंडे या दाम्पत्याने फॉरेन एक्सचेंज करन्सी नावाने व्यवसाय सुरु केला .२०१६ साली त्यानी कोलशेवाडी परिसरात राहणाऱ्या दिपाली शिनगारे या महिलेला रक्कम गुंतवणूक करा तुम्हाला दुप्पट करून देतो आमिष दाखवले या आमिषाला बळी पडत दिपाली यांनी त्यांना वर्षभरात एकूण 23 लाख २० हजार रुपये देवू केले .त्याच प्रमाणे गावंड दाम्पत्याने अनेक जणांना काही महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले होते मात्र तीन वर्षाचा कालावधी उलटूनही पैसे पार्ट दिले नाहीत तसेच याबाबत विचारणा केली असताना त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांमुळे दिपाली यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी रवींद्र गावंड व अनिता गवंड विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी रवींद्र गावंड व अनिता गवंड विरोधात गुन्हा दखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.
Please follow and like us: