दुचाकीस्वरावर चाकूने हल्ला करत लुबाडले
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०९ – कल्याण पुर्वेकडील मलंग रोड आनंदी परडाईज येथे राहणारे राहुल मिश्रा शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सूमारास चेतना येथिल रस्त्यावरून दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने कृष्णा तिवारी आपल्या दोन साथीदारासह दुचाकी ने आला त्याने मिश्रा यांच्या दुचाकीला धडक देत खाली पाडले. या तिघातील एका ने मिश्रा वर चाकूने हल्ला करत त्याच्या डोक्यात दगड घातला व मिश्रा यांच्या खिशातील 18 हजार 600 रुपयांची रोकड व गळ्यातील सोन्याची चैन खेचून पळ काढला या प्रकरणी मिश्रा यांनीं कोळशेवाडी पोलीस स्थनाकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी कृष्णा तिवारी व त्याच्या दोन साथीदारा विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us: