दुकानातून 5.50 लाखांचे मोबाईल लंपास
( श्रीराम कंदु )
कल्याण पश्चिमेकडील आग्रा रोड पारिजात सोसायटीमध्ये राहणारे गिरीष शहा यांचे टिळक चौक येथे इन्फोकॉम प्रा. ली. नावाने मोबाईलचे दुकान आहे. दोन दिवसापूर्वी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत नवीन उर्फ रमेश देवाशी हा दुकानात घुसुन दुकानातील साडे पाच लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल चोरून निघून गेला. ही बाब निदर्शनास येताच शहा यांनी शनिवारी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल।करत पुढील तपास सुरू केला आहे.