दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ६७ हजार १०० रुपयांची रोकड लंपास – डोंबिवलीतील घटना
कल्याण दि.०३ – डोंबिवली पूर्वेकडील रामनगर चित्त रंजन दास रोड गणेश अपार्ट मेंट मध्ये राहणारे प्रेमजी जेठा याचे मानपाडा रोड येथील मधुशिल्प इमारती मध्ये दुकानं आहे. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकानं बंद करत घरी निघून गेले. रात्री सुमारास दुकानं बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानात ठेवलेले ६७ हजार १०० रुपयांची रोकड चोरून नेली. रविवारी सकाळी दुकानं उघडल्यानंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: