दुकलीने ट्रक ड्रायव्हर व क्लिनर ला लुबाडले

कल्याण दि.१९ – अहमदनगर कोपरगाव येथे राहणारे गजानन भोसले दुधाच्या टँकरवर ड्रायव्हर आहेत. काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गांधारी बाप गाव मार्गे दूध वाटप करून जात असताना आधारवाडी जेल नजीक पोहोचले असताना दोन अज्ञात इसम दुचाकीवर आले त्यांनी भोसले यांची गाडी थांबवून गाडी मध्ये चढून भोसले यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले क्लिनर भाऊसाहेब सोमाशे यांचे खिसे तपासले.

त्यांच्या खिशात काहीच न सापडल्याने त्यांनी ट्रक मध्ये शोध शोध सुरु केली ट्रक च्या मागील सिट च्या मागील कप्प्यात ३३ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून तेथून पळ काढला. या प्रकरणी भोसले यांनी खडकपाडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email