दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग प्रात्यक्षिक विशेष कार्यशाळा संपन्न

( म विजय )

ठाणे: शिवसेवा मित्र मंडळ ठाणे, आयोजित यांनी दिवाळी निम्मित्त आज रविवार दि १५ ऑक्टोबर २०१७ सकाळी १०.३० वाराजेंद्रपाल मंगला हिंदी हायस्कूल दुसरा मजला लोकमान्य टिळक रोड, ठाणे पूर्व.येथे प्रा. श्याम धुरी यांच्या मार्गदर्शना खाली दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग प्रात्यक्षिक हि विशेष कार्यशाळा संपन्न झाली या दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळेत जवळपास १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन आकाश कंदील निर्मितीचा मनमुराद आस्वाद घेतला आयोजकांनी आजच्या पीढीचे ‘बालपण’ जपले आकाश कंदिलाचा आकर्षक कला कृती साकार होत होत्या लाल, हिरवे ,पिवळे ,रंग पाहून प्रत्येक मुलाचे मन दंग होत होते या कार्यशाळेत वय वर्षं १० व वरील सर्वां मुलांनी तसेच १० वर्षाखालील मुलांनी आजी,आजोबा व आई,बाबां बरोबर ययांच्या सोबत कार्यशाळेत भाग घेतला थोडक्यात आपल्या मुलांसोबत नव्याने बालपण जगले यामध्ये मुलांना कल्पक कलात्मक आकाशकंदील व वैविध्यपूर्ण रंगीत पणती पेंटींग घडविण्याचे मार्गदर्शन मिळाले .. या कार्यशाळेत बनवलेले आकाशकंदील मुले आपल्या घरी कंदील लावून दिवाळी सजविण्याचा आनंद मुलांसह पालकांनाही घेता येणार आहे
सदाशिव पाटील उपमुख्याध्यापक बालमोहन विद्यामंदिर राज्य शिक्षक पुरस्कार २०१६-१७ विजेते यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले त्यांनी मुलांना आकाशकंदील व दिवाळी या सणाचे महत्व सांगितले. या वेळी अनिल भोर, ठाणे परिवहन सभापती ,संदीप लेले – शहर अध्यक्ष भाजपा,गिरीश राजे-शिवसेना विभाग प्रमुख विकास थोरात – अभिनेते महेश कोळी – जेष्ठ रांगोळीकार आदी मान्यवर उपस्थित होते असे आपल्या प्रसिद्धी पत्रकात अध्यक्ष अजय नाईक यांनी म्हटले आहे
अधिक माहितीसाठी संपर्क ९८३३१५८८०

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email