दिव्यांगाच्या मतदार नोंदणीतील अडथळे त्वरित दूर करणार जिल्हाधिकारी कार्यालयात देखील विशेष कक्ष सुरु

ठाणे दि.२५ – दिव्यांगाना मतदार म्हणून नोंदणीत येणारे अडथळे त्वरित दूर करण्यात येतील तसेच नोंदणी कक्षही शक्यतो तळमजल्यावर असतील हे पहिले जाईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सोमवारी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दिव्यांगांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एकून ४० संस्थांची उपस्थित होती.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणी सोडविणे हा होता. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजला येथे सेतू केंद्रात दिव्यांग मतदारांसाठी नोंदणी व संपर्क केंद्र सुरु करण्यात आले आहे व ते सकाळी ८ ते रात्री १० पर्यत अशी आहे. दिव्यांग मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करून करून घेण्यासाठी हा विशेष कक्ष तयार करण्यात आला असून त्याच्या उपयोग करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा :- गणेशोत्सव-नवरात्रोत्सव लागणाऱ्या परवानग्या आता ऑनलाईन!

आता पर्यंत ठाणे जिल्ह्यात एकुण मतदार नोंदणी ही ५९ लाख २७ हजार ००७ असून यामध्ये दिव्यांग व्यक्तीची संख्या ही २ हजार ५८२ अशी आहे. यावेळी फॉर्म क्र ६,७,८(अ) यांची माहिती देण्यात आली. फॉर्म क्र ६ हा १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीसाठी आहे. तर फॉर्म क्र ७ हा नावे काढून टाकणे किंवा मयत व्यक्ती इ.व फॉर्म क्र ८(अ) नावात बदल करण्यासाठी किंवा स्थलांतर झालेल्या व्यक्ती,विवाहित स्त्री इ.अशा प्रकारे फॉर्मविषयी माहिती देण्यात आली.

हेही वाचा :- सैनिकांच्या मुलांसाठी वसतिगृह प्रवेशाचे आवाहन

निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये दिव्यांग घटकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी उपलब्ध असलेले साहित्य उदा. ब्रेल लिपी व चिन्हाची भाषाचा वापर करण्यात यावा. दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष मतदान करणे, सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या / येणा-या सोयीसुविधांबाबत माहिती देण्यात यावी. उदा. ब्रेल, माहिती फलक, चिन्ह, चित्र, मोठे मजकूर व दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेमध्ये समाविष्ट करणेकामी येणारे अडथळे दूर करणे (जसे शारिरीक, अंगस्थिती, दळणवळण, धोरण, सामाजिक, परिवहन इ.) अशा सर्व प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. याप्रसंगी काही दिव्यांग व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्या. टोल फ्री क्र ०२२-२५३४४१४३, व वेबसाईट www.ceomaharashtra.gov .in/www.thaneelction.com वर पूर्ण महिती उपलब्ध आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email