दिवाळीत एसटी प्रवास महागणार :भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागु

(म.विजय)

मुंबई – दिवाळी सुट्टीच्या कालावधीत  १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ २० दिवसांसाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीतच सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र यावर्षी  १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

एस. टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्के पर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दिवाळी सुट्टीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. यंदा यानुसारच दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारासाठी केवळ २० दिवसासाठी सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली असून सदर भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.