दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या कुटुंबियांनी भाजपला ठोकला रामराम

चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजप मध्ये हिरमोड झाल्याने श्रीनिवास वनगा,प्रफ्फुल वनगा नाराज झाले आहेत.मतोश्रीवर जावून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.जयश्री वनगा व दोन्ही मुले यांची पत्रकार परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली होती त्यात सदर माहिती देण्यात आली.

गेली 35 वर्ष चिंतामण वनगा यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला .भाजप पक्षाच्या नेत्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे.वनगा कुटुंबातील सदस्यना वाऱ्यावर सोडून दिले आहे.आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच्याकडे वेळ मागितली होती पण वेळ दिली नाही.आम्ही भाजप सोडत आहोत.गेली ३५ वर्ष वडिलांनी पक्षासाठी काम केलं.जेव्हा पक्षाला फक्त २ मतं पडायची तेव्हापासून वडील काम करत होते .पण आज आमची अवस्था काय झाली आहे .आमच्यावर कोणताही राजकिय दबाव नाही.असही यावेळी सांगण्यात आलं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email