दारू चायनीज पार्टीच्या कॉन्ट्रीब्युशन च्या वादातून अल्पवयीन मुलाची हत्या कल्याण नजीक म्हारळ येथील घटना
कल्याण दि.१९ – दारू पार्टी मध्ये बसलेल्या तिघांमध्ये पैशांच्या कॉन्ट्रीब्युशनवरून वाद झाला याच वादातून एका १६ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्दयतेने हत्या करण्यात आल्याची घटना कल्याण नजीक म्हारळ येथे घडली आहे. फैयाज आलम खान असे या मयत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
कल्याण नजीक टिटवाळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेले म्हारळ परिसर गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमुले चर्चेत आला आहे. हत्या चोऱ्या मारहाण अशा घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. काल रात्रीच्या सुमारास म्हारळ परिसरात राधेकृष्ण नगरी मोहन नगरी चाळीत राहणारा फैयाज खान ( १६ ) आपल्या तीन मित्रांसोबत याच परिसरात असलेल्या चायनीज वर दारू पीत होता.
मात्र यावेळी मित्रमंडळी मध्ये पैशांच्या कॉन्ट्रीब्युशनवरून वाद झाला याच वादातून फैयाजची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्दयतेने हत्या करण्यात आली. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला असून दोन संशयित जणांना ताब्यात घेतले असून त्यामधील एक जन फैयाज चा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.