दारुसाठी पैसे मागणे व शिवीगाळ केल्याने संतापलेल्या चुलत भावाने केली  भावाची हत्या 

डोंबिवली  – चुलत भावाकडून दारूसाठी सतत पैसे मागणे आणि दारूचा नशेत शिवीगाळ करण्याच्या रागातून चुलत भावानेच एका साथीदाराच्या मदतीने आपल्या भावाची हत्या केल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ज्ञानेश्वर कोट असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी चुलत भावासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील मोहोने गावात राहणारा शेतकरी ज्ञानेश्वर कोट हा तरुण १३ फेब्रुवारी पासून बेपत्ता झाला होता. त्याबाबत त्याची पत्नी सुरेखाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करीत आपल्या पतीच्या जीवाला धोका होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानुसार खडकपाडा पोलासांनी तपास सुरु केला. याच दरम्यानमयत ज्ञानेश्वर हा. १३ फेब्रुवारी त्याचा चुलत भाऊ मोतीराम कोट आणि पडघा येथे राहणाऱ्या निखील जाधव यांच्यासोबत दिसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेत ८ मार्च रोजी निखील याला ताब्यात घेतले. निखीलकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आणि मोतीरामने मिळून ज्ञानेश्वरची हत्या केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी मोतीराम याला अटक केली. त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार,मोतीरामकडे ज्ञानेश्वर हा दारू पिण्यासाठी नेहेमी पैसे मागत असे आणि दारू प्यायल्यानंतर तो मोतीरामलाच शिवीगाळ करीत असे. या प्रकाराला वैतागलेल्या मोतीरामने हा राग मनात धरून निखिलच्या मदतीने ज्ञानेश्वरची हत्या केली.याबाबत खडकपाडा पोलीस स्थाणकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी   महाशिवरात्रीच्या  दिवशी मोतीराम एनपीएल कंपनीजवळील कामाच्या ठिकाणी ज्ञानेश्वर याला नेले.  तेथे त्यांनी ज्ञानेश्वरला भरपूर दारू पाजली. नंतर त्यांनी मद्यधुंद अवस्थेतील ज्ञानेश्वरच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला आणि गळा कापून त्याची हत्या केली. ज्ञानेश्वर मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी एका गोणीत त्याचा मृतदेह भरून एनपीएल कंपनीच्या कम्पौंडच्या बोगद्यातून बाहेर कडून मागील दलदलीच्या जागेतील गवतात नेऊन टाकला. खडकपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या हत्येमागील गूढ उकलण्यात यश मिळवले असून सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत असे सांगितले .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email