दागिन्यासह लाखांचा ऐवज चोरला

कल्याण-एका घरात चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच कल्याण येथे घडली.याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतिल गांधी चौक येथे असणा-या गायत्री सदन येथील रहिवासी परेश ठक्कर यांच्या घरी चोरी करुन चोरांनी दागिने,रोख रक्कम,घड्याळ असा सुमारे १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरला.सोमवारी सदर घटना घडली.याप्रकरणी ठक्कर यांच्या तक्रारी नुसार बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.