दागिने पैसे यांच्याबरोबर चोराने स्पर्धेतील पदकेही चोरली

(श्रीराम कांदु)

कल्याण-चोरी करणा-या चोराने दागिने पैसे याच बरोबर क्रीडा स्पर्धेतील पदके चोल्याचा प्रकार कल्याण येथे घडला आहे.याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोषनगर विभागात रहाणारे सुखदेव कुंभारे याच्या घराचे लॅच तोडून चोराने लहान मुलांचे दागिने रोकड़ व पदके असा ऐवज लंपास केला.या ऐवजाची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.महत्वाचे म्हणजे कुंभारे यांची कन्या भावना हिने शालेय जीवनात अॅथलेटीक्समधे मिळवलेली विविध पद्केही चोराने चोरून नेली.राज्य तसेच राष्टीय पातळीवरील ही पदके होती.कुंभारे यांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email