त्‍याच्‍या’ हातील तडफडणारा तिरंगा पहिल्‍यांदा फडफडला सिग्‍नल शाळेत रंगला अनोखा स्‍वातंत्र्यदिन स्‍वातंत्र्यदिनी सिग्‍नल शाळा झाली डिजीटल कर्तृत्‍व फाऊंडेशनकडून सिग्‍नल शाळेला अनोखी भेट

ठाणे दि.१५ – तसा झेंडा त्‍यांना नवीन नाही क्रांतीदिनालाच ते तीन चार हजार जमवून झेंड्याचा माल भरतात. प्रजासत्‍ताकाचा असो वा स्‍वातंत्र्याचा तो तिरंगा त्‍यांच्‍या धंदयाचा माल राहिला. दोन वर्षभरापूर्वी सिग्‍नल शाळेने त्‍यांच्‍या आयुष्‍यात शिक्षणाचे रंग भरले आणि आजपर्यंत माल म्‍हणून या चिमुकल्‍यांच्‍या हातात तडफडणारा तिरंगा आज खरया अर्थाने फडफडला. सिग्‍नलशाळेतील मुलांनी त्‍यांच्‍या आयुष्‍यातील अनोखे ध्‍वजवंदन केले. भारतमातेच्‍या या लेकरांनी मग खणखणीत कवायत आणि लेझिम नृत्‍याने तिरंग्‍याला आगळीवेगळी सलामी दिली. आजबरोबर आज कर्तृत्‍व फाऊंडेशनने आज सिग्‍नल शाळेला पुर्णपणे डिजीटल केले. उदयापासुन सिग्‍नल शाळेचे सगळे शिक्षण डिजीटल स्‍वरूपात शिकवले जाणार आहे.

तीन हात नाक्‍यावरील चौदा कुटुंबातील जवळपास 40 मुले जन्‍मापासून पुलाखाली परागंदा आयुष्‍य जगत होती. सण उत्‍सवाच्‍या नैसर्गिक आनंदापासून हिरावत जगण्‍याची कसरत करणारी ही मुले दिड वर्षापूर्वी सिग्‍नल शाळेच्‍या माध्‍यमातून शिकती झाली. आजवर प्रजासत्‍ताक दिन असो अथवा स्‍वातंत्र्यदिन असो त्‍यांच्‍यासाठी ती धंदयाची पर्वणी असायची. क्रांतीदिनालाच ते दादर, भायकळा मार्केटमधुन झेंडयाचा माल आणून मध्‍यमवर्गीय, उच्‍चमध्‍यमवर्गीयांच्‍या देशप्रेमाला इनकॅश करण्‍याचा त्‍यांचा सिरस्‍ता असे. क्रांतीदिन ते स्‍वातंत्र्यदिन अशा दिवसात 4 हजाराचा माल 6 हजाराला विकून त्‍यातून मिळालेल्‍या 2 हजारात भूकेवर स्‍वातंत्र्य मिळवत असत.

दोन वर्षभरापूर्वी समर्थ भारत व्‍यासपीठ व ठाणे महानगरपालिकेच्‍या संयोगाने या मुलांच्‍या आयुष्‍यात खरया अर्थाने स्‍वातंत्र्याची पहाट अवतरली. विधिवत शिक्षणाबरोबरच एक माणूस म्‍हणून घडण्‍याचा त्‍यांचा प्रवास सुरू झाला. या अनोख्‍या स्‍वातंत्र्याचे मोल जाणत या मुलांनी मग राष्‍ट्रप्रतिक तिरंग्‍याला मनस्‍वी सलामी दिली. गेल्‍या एक महिन्‍यापासून सिग्‍नल शाळेतील क्रीडा शिक्षकाच्‍या तालमीत कवायत आणि लेझीमची कठोर तालिम करत आज सिग्‍नल शाळेच्‍या मुलांनी तिरंग्‍याला अनोखी मानवंदना दिली.

कर्तृत्‍व फाऊंडेशने आज सिग्‍नल शाळेला अनोखी भेट दिली. सिग्‍नल शाळेचा बालवाडी ते दहावी पर्यंतचा अभ्‍यासक्रम आता पुर्णपणे डिजीटल स्‍वरूपात शिकवता येणार आहे. फाऊंडेशने हा सगळा अभ्‍यासक्रम डिजीटल स्‍वरूपात उपलब्‍ध करून दिला आहे. याच बरोबर शाळा डिजीटल करण्‍यासाठीची तांत्रिक सुविधा देखील फाऊंडेशनने पुरवल्‍या आहेत. यावेळी फाऊंडेशनचे अध्‍यक्ष संतोष जोशी, उपाध्‍यक्ष मंदार नामजोशी व विजय बनसोडे उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email