त्या चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांची चार विशेष पथक

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०८ – येथील पूर्वेकडील देसले पाडा येथे घराबाहेर खेळताना बेपत्ता झालेल्या सात वर्षाच्या अथर्वला गुंगीचे औषध पाजून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हत्येच्या उद्देशाने त्याला ड्रेनेजच्या टाकीत फेकून दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हे दाखल करत त्यांचा शोध सुरू केला. पोलीस उपायुक्त शिदे यांनी या आरोपींचा शोधासाठी चार विशेष पथक तयार केले आहे.

डोंबिवली देसलेपाडा येथे राहनारा चिमुकला २४ मे रोजी खेळता खेळता घराबाहेरून बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी या मुलाचा मृतदेह जवळच्या ड्रेनेजच्या नाल्यात सापडला होता. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टर्सना अथर्व वर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आल्याने त्यांनी मृतदेह तपासणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवला होता. जे जे रुग्णालयातील डॉक्टराना देखील शवविच्छेदन करताना असाच संशय आल्याने त्यांनी मृतदेहाचे अवशेष केमिकल अनालिसिस साठी धाडले होते. यानंतर मानपाडा पोलिसानी अथर्वच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता काही संशयितांना पोलिसानी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली होती. ज्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत मृतदेह आढळून आला त्या इमारतीच्या पाच बिल्डर विरोधात इमारत बांधताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत या पाचही बिल्डरांना मानपाडा पोलिसानी अटक केली होती. मात्र केमिकल अनालिसिसच्या अहवालाअभावी या प्रकरणाचा तपास रखडला होता. अखेर दिड महिन्यांनी या केमिकल अनालिसिसचा अहवाल प्राप्त झाला असून या सात वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करत त्याला गुंगीचे औषध देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच यानंतर त्याला नजीकच्या इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत फेकून त्याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या टाकीत गुदमरून या चिमुकल्याचा अंत झाला असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. आपल्या मुलाच्या आरोपीना लवकारत लवकर अटक करत कठोर शिक्षा करावी या मागणी साठी या चिमुकल्याच्या आई सह कुटुंबीयांनी कल्याण परिमंडळ तीन चे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली यावेळी शिंदे यांनी या आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात करत आरोपिचा शोध सुरू करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email