तोतया पोलिसाचा दुकानदाराला गंडा

कल्याण – दुकानदाराला एका भामट्याने पोलीस असल्याची बतावणी करत तुम्ही गुटखा विकत असल्याचे सांगत दुकानातून व दुकानाराकडून असे मिळून एकूण ७ हजार सहाशे रुपये काढून घेतल्याची  घटना घडली आहे .या प्रकरणी सदर दुकानदाराने टिळक नगर पोलीस स्थानकात भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनी राजश्री कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे आदित्य संघवी यांचे गोग्रासवाडी परिसरात किरणा मालाचे दुकान आहे .काल सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास एक इसम त्यांच्या दुकानात आला तुम्ही दुकानात गुटखा ठेवत असल्याचे सांगत त्याने दुकानाची व दुकानाच्या गल्ल्याची झडती घेवून दुकानातील व संघवी यांच्याकडील मिळून ७ हजार ६०० रुपये काढून घेत तेथून काढता पाय घेतला .काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात तोतया पोलीसा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email