तुर्कीच्या राष्ट्रपतींचे पंतप्रधानांशी दूरध्वनीवरुन संभाषण

नवी दिल्ली, दि.१६ – तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तैयप एर्दोगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज दूरध्वनीवरुन संवाद साधला. भारतात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांप्रती एर्दोगन यांनी शोक व्यक्त केला आणि यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी कामना व्यक्त केली.

हेही वाचा :- पंतप्रधानांनी अबु-धाबीच्या युवराजांशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद

दहशतवाद हा जागतिक आणि सुरक्षिततेला एक मोठा धोका आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. सर्व राष्ट्रांनी दहशतवादाविरोधात तातडीने आणि ठोस कारवाई करावी यावर पंतप्रधानांनी भर दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email