तुम्हीच ठरवा नांदेडमध्ये कुणाचा विजय मोठा!

महेश शर्मा

*१) २०१२ च्या निवडणुकीत भाजपाने १४ जागा लढल्या आणि एकूण १६,९०५ मते प्राप्त केली. ३.५१ टक्के मते घेत २ जागा जिंकल्या. २०१७ च्या निवडणुकीत ६४,५८६ मते मिळवून ६ जागा पक्षाला जिंकता आल्या. मतांची टक्केवारी २४.७१ वर गेली. ५१ जागांवर भाजपा क्रमांक २ वर राहीला. ११ जागी भाजपा क्रमांक ३ वर आहे. २०१२ मध्ये २ जागा जिंकताना केवळ ३ जागी पक्ष क्रमांक २ वर होता.*

*२) कॉंग्रेस पक्षाला २०१२ च्या निवडणुकीत १,८७,३०० मते मिळाली होती, या निवडणुकीत भलेही जागा वाढल्या (७३) असतील पण, केवळ १,२१,३८६ मते मिळाली.*

*३) शिवसेनेने २०१२ च्या निवडणुकीत ८७,९३० मते घेतली होती, १४ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत केवळ २२,४४० मते त्यांना प्राप्त करता आली आणि १ जागेवर समाधान मानावे लागले.*

*४) राष्ट्रवादी कॉंग्रेसला २०१२ च्या निवडणुकीत ७१,१६४ मते मिळाली होती, या निवडणुकीत केवळ ९२९६ मते त्यांना प्राप्त करता आली आणि एकही जागा प्राप्त करता आली नाही.*

*५) थोडे मागे वळून पाहू: २०१४ च्या नांदेड लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला १,८६,०१९ मते मिळाली होती, तर भाजपा-सेना युतीला १,१५,१६५. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष वेगळे लढले. भाजपाला २ विधानसभा मतदारसंघ मिळून ७५,३८३ मते मिळाली, कॉंग्रेसला ७२,११८ तर सेनेला ६८,९३९.*

*आता तुम्ही म्हणाल, गिरे तो भी टाँग ऊपर म्हणा ना भाऊ, पण अनेकांची ठेचून केली आहे टाँग ऊपर…*

Please follow and like us:

2 thoughts on “तुम्हीच ठरवा नांदेडमध्ये कुणाचा विजय मोठा!

 • October 15, 2017 at 8:52 pm
  Permalink

  सही बात और सही विश्लेषण

  Reply
  • October 15, 2017 at 8:55 pm
   Permalink

   धन्यवाद करणजीव शर्मा जी

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email