तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे,नकार दिला तर याद राखा !
नगर – अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे. नकार दिला तर याद राखा, असा दम दिला. तसेच मुलीचा विनयभंग केला.या प्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नंदकुमार मारुती कुलाळ याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा अकोले पोलिसांनी दाखल केला आहे.
याबाबत अकोले पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपण घरात असताना आरोपी कुलाळ हा बळजबरी घरात घुसला. तसेच त्याने माझ्या वडिलांना माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?
यावेळी वडिलांनी त्यास विरोध केला असता, कुलाळ याने आपला हात धरून ओढत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. तसेच तुम्हाला कापून टाकेन, अशी धमकी दिली. मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी कुलाळ विरूद्ध अकोले पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास काळे करत आहेत.