तुमच्या मुलाचे लग्न जमेल असे सांगत डोंबिवलीत भूलथापा देत वृद्ध नागरिकाला लुबाडले

डोंबिवली: कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात भूलथापा देत पादचारी नागरिक विशेषतः महिला वृद्ध नागरिकांचे लक्ष विचलित करत भूलथापा देत बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील किंमती ऐवज व रोकड लंपास करण्याच्या घटना वाढल्याने पोलिस यंत्रणेसमोर आवाहन उभे ठाकले आहे .त्यातच दोन भामट्यांनी  काल डोंबिवली मध्ये एका 64 वर्षीय वृद्ध इसमाला भूलथापा देत तब्बल 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली .
डोंबिवली पूर्वेकडील नंदिवली रोड शिवशाही सोसायटी मध्ये राहणारे नारायण करळकर  64 हे काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पेपर आणण्यासाठी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात जात होते यावेळी एक अज्ञात इसमाने त्यांना हटकले त्याने करळकर याना एका हॉस्पिटलचा पत्ता विचारला .करळकर यांनी पत्ता माहीत नसल्याचे सांगत पुढे चालत असताना दुसऱ्या इसमाने त्यांना पुन्हा थांबवले व तुम्ही कोणत्या देवाला मानता असे विचारले करळकर यांनी गणपती व हनुमान याना मानतो असे सांगताच या अज्ञात इसमाने तुम्ही अगरबत्ती आणा तुंमच्या मुलाचे लग्न जमेल असे सांगत शेजारी एका दुकानाच्या कोपऱ्यात नेले तेथे या अज्ञात इसमाने त्याच्या सोबत असणा-या दुसऱ्या इसमाजवळ करलरक याना स्वतः जवळील रोख रक्कम व दागिने एका रुमालात देण्यास सांगितले व बोलण्यात गुंतवुन मंत्रजाप करत 50 पाऊले चालण्यास सांगितले .या भुलथापांना बळी पडत करळकर यांनी दागिने व रोख रक्कम असा मिळून एकून 55 हजारांचा मुद्देमाल त्या रुमालात ठेवत पुढे निघून गेले .50 पाऊले चालल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले असता हे दोन्ही अज्ञात इसम पसार झाले होते .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर  प्रकरणी करळ कर यांनी डोंबिवली पोलिस स्थानकात तक्रार नोंदबली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email