तीर्थक्षेत्र पिंपळेश्ववर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित उत्सव
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवलीनजीक सांगावं ,मुरारबाग येथील प्राचीन तीर्थक्षेत्र श्री पिपळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित विविध धार्मिक उत्सव आयोजित करण्यात आले आहेत.राज्य शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून घोषणा केल्यानंतर विविध सुविधा करण्यात आल्याचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.
१३ ता महाशिवरात्रीनिमित सकाळी ९ पासून २४ तास अखंड रामनाम भजन आयोजित करण्यात आले आहे तर १० वाजता नेत्र परीक्षण ,चश्मादान शिबीर ठाणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आयोजित केले आहे
१४ तारखेला सत्यनारायण महापूजा ,हरिपाठ ,संतदास मनसुख याचे कीर्तन असा दिवसभर कार्यक्रम आहे पंचक्रोशीतील नागरिकांसह डोंबिवलीकर मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात असे म्हात्रे म्हणाले १४ रात्री महाप्रसाद लाभ घ्यावा असेही आवाहन केले आहे
Please follow and like us: