तीन महिन्यात सावली गावचे पुनर्वसन ; आमदार संदीप नाईक यांची माहिती

नवी मुंबई –घनसोली येथील सेंट्रल पार्कमुळे बाधित होणार्‍या सावली गावचे पुनर्वसन येत्या तीन महिन्यांत होईल, याबाबत पालिका आयुक्तांशी बोलणे झाले असून त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेवू, असे आश्‍वासन दिल्याची माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे.
आमदार नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांनी बुधवारी घनसोली येथील सेंट्रल पार्क आणि कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानाच्या कामाचा आढावा पाहणीदौर्‍यात  घेतला. त्याप्रसंगी आमदार नाईक यांनी सेेंट्रल पार्कचे लोकापर्ण होण्यापूर्वी सावली गावचे पुनवर्सन करावे, अशी सुचना पालिका अधिकार्‍यांना केली आहे.
मुळ ४४ चौरस मिटरचा सेंट्रल पार्कचा भुखंड सिडकोने नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरित करताना कमी आकाराचा  केला. त्यामुळे सिडकोकडे उर्वरित जागेची मागणी करणार असून ती जागा उपलब्ध झाल्यावर पार्कींग आणि इतर सुविधांसाठी तीचा उपयोग करता येईल, असे आमदार नाईक म्हणाले.  सेेंट्रलपार्क कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेणार नसून काम सुरु असतानाच सर्व त्रुटी दूर कराव्यात, असे निर्देश दिले.
आमदार संदीप नाईक यांनी पाठपुरावा करुन सेंट्रलपार्कसाठी राज्य शासनाकडून ४ कोटी ५ लाख रुपयांचा निधी पालिकेला मिळवून दिला आहे. हे सेंट्रलपार्क केवळ घनसोलीकरांचेच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईकरांचे आकर्षक पर्यटनस्थळ ठरणार आहे. घनसोली हे स्वातंत्रयसैनिकांचे गाव आहे. त्यामुळे या पार्कमध्ये स्वातंत्रयसैनिकांचा प्रेरणास्तंभ असावा, अशी इच्छा आमदार नाईक यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पार्कच्या प्रवेश दवाराजवळ  स्वातंत्रय सैनिकांचा प्रेरणास्तंभ  उभारण्याच्या सुचना महापौर सुतार यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. पार्कच्या ठिकाणी एक जलतरण तलाव देखील बांधण्यात येणार असून त्यामुळे स्विमिंगसाठी एक चांगली सोय निर्माण होणार आहे. नवी मुंबईची मुले स्केटिंग या खेळप्रकारात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळवित आहेत मात्र नवी मुंबईत एकही स्केटिंगपार्क नसल्याने त्यांना सरावासाठी पालघर येथे जावे लागते. ही गैरसोय लवकरच दूर होणार असून पार्कच्या ठिकाणी एक स्केटिगपार्क देखील उभे राहणार आहे. पार्कच्या बाहेरील जॉगिंग ट्रॅकमध्ये नागरिकांना विनामुल्य जॉगिंक करता येणार आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात येणार्‍या लॉनवर नागरिकांना परवडतील अशा शुल्कात समारंभ साजरे करता येणार आहेत. त्यामधून पार्कच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होणार आहे. पार्कच्या कामाच्या दुसर्‍या टप्प्यात आमदार निधीतून या ठिकाणी योगावर्गासारख्या सुविधा देण्याचा मानस आमदार नाईक यांनी बोलून दाखविला. सेंट्रलपार्क नवी मुंबईकरांसाठी मनोरंजन, विरंगुळा देणारे आणि प्रबोधन करणारे पर्यटनस्थळ ठरेल, असा विश्‍वास आमदार नाईक यांनी बोलून दाखविला.
महापौर सुतार यांनी सावली गावाच्या पुनर्वसनाबाबत आमदार नाईक यांनी सुचित केल्याप्रमाणे पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेवून सिडकोकडे स्वतंत्र जागेची मागणी करण्यात येईल असे सांगून पुनर्वसन नक्की होईल, अशी खात्री व्यक्त केली. सेंट्रल पार्क नवी मुंबईकरांसाठी आकर्षक पर्यटनस्थळ ठरेल, असे महापौर सुतार म्हणाले.
या पाहणीदौर्‍या प्रसंगी पालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील,  प्रभाग समिती सदस्य शिरिष पाटील,  प्रभाग समिती सदस्य प्रमोद कदम, जयेश कोंडे, सुनिल म्हात्रे आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

निसर्ग उद्यानात आमदार निधीतून ओपन जीम

सेंट्रल पार्कबरोबच आमदार नाईक आणि महापौर सुतार यांनी कोपरखैरणे येथे साकारत असणार्‍या निसर्ग उद्यानाचा देखील पाहणीदौरा केला. लोकनेते गणेश नाईक यांच्या सुंदर आणि हरित नवी मुंबईच्या संकल्पनेतून पालिकेने डंपिंग ग्राउंडच्या जागेवर निसर्ग उद्यानरुपी नंदनवन फुलविले आहे. रोज सकाळी हजारो अलाबवृध्द या ठिकाणी मॉर्निंगवॉकसाठी येत असतात. त्यांच्या मागणीनुसार सा ठिकाणी रस्ते, पदपथ अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. खुल्या व्यायामशाळेची मागणी देखील नागरिकांकडून होत होती त्यानुसार आमदार नाईक यांनी या व्यायासमशाळेसाठी त्यांच्या आमदारनिधीतून १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहिर केले. या व्यायामशाळेचे कामही लवकरच सुरु होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email