तीन दिवसात ६७ हजार रु.दंडात्मक कारवाई , ७३ किलो प्लास्टिक जमा
डोंबिवली दि.२५ – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पहिल्याच दिवशी २३ तारखेस सायंकाळपर्यंत प्लास्टिक बाळगळणा-या ७ विक्रेत्यांवर कारवाई करून रुपये ५०,००० दंड वसूल केला. तर सोमवारी १७, ५०० असे एकूण ६७, ५०० इतकी दंडात्मक रक्कम १७ विक्रेत्यांकडून वसूल करणेंत आली आहे संकलन केंद्रावर गेल्या २ दिवसात सुमारे ७३ किलो प्लास्टिक जमा करण्यात आले.
कडोमपा क्षेत्रात १० प्रभागक्षेत्र कार्यालये आहेत. या प्रत्येक प्रभागक्षेत्रासाठी प्रत्येकी ५ जणांचे पथक तयार करण्यात येणार असुन, या पथकांमार्फत प्लास्टिकच्या वापर करणा-या दुकानदार व विक्रेत्यांवर कारवाई सुरु झाली आहे.महापालिकेने कल्याणमध्ये सुभाष मैदान व आधारवाडी डंम्पिंग ग्राऊड, स्वानंद नगर मैदान, बेतुरकरपाडा, ओक हायस्कूल तळ मजला, श्रीराम भुवन, पार नाका, येथे तर डोंबिवलीत समतोल इको वर्क्स,म.गांधी रोड, डोंबिवली पूर्व, हळबे व्यायामशाळा, मल उदंचन केंद्र, अण्णा नगर कोपर, मातोश्री ट्रस्ट- सोनारपाडा या ठिकाणी प्लास्टिक वेस्ट बॅंक सुरू केल्या आहेत. नागरिकांनी आपल्या जवळील प्लास्टिक पिशव्या तेथे जमा कराव्यात, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर त्यांनी केले आहे.
Hits: 39