तालसंग्राम ढोलवादन स्पर्धेत शिवाजीनगर ध्वजपथक प्रथम मानकरी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली-आरंभ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या पहिल्या ढोलताशा वादन स्पर्धेत भिवंडीच्या शिवाजीनगर ध्वजपथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.दिड लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात शनिवार ,रविवार असे दोन दिवस ही स्पर्धा संपन्न झाली.यात १४ संघांनी भाग घेतला होता.या स्पर्धेत दूसरा क्रमांक पार्लेश्वर ढोल पथक (विलेपार्ले)तर तृतीय क्रमांक आविष्कार पथक (वसई)यांनी मिळविला.या प्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,आमदार जगन्नाथ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत ठाणे,कल्याण,रायगड ,नवी मुंबई , मुंबई येथील संघांनी भाग घेतला होता.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email