…तर राजीनामे देण्यास तयार , २७ गावातील नगरसेवकांची एकजूट

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महालिकेतून २७ गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी होत आहे. मात्र त्या पूर्वी नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड कुठे असेल ,पाणी पुरवठा कसा करणार व विकासाला पैसे कुठून उभे करणार याची योग्य उत्तरे दिली. तर सर्व नगरसेवक आपल्या पदाचे राजीनामे देण्यास तयार आहे गेल्या ३५वर्षात या भागाचा विकास आत बाहेर मूळे रखडला असून आम्हाला विकास हवा अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

२७ गावातील सर्व पक्षीय नगरसेवाची नुकतीच एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात सर्वानी विकासाच्या प्रश्नाअवर एकत्र रहाण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भात माहिती देताना एका नगरसेवकाने सांगितले. की १९८३ ते २०१८ या ३५ वर्षात हा भाग विकासापासून वंचित असून आता कुठे काही कामे सुरू झाली आहेत. स्वतंत्र पालिका झाली की या भागाचा कचरा कुठे टाकणार ,पाणी पुरवठा कसा करणार ,विकासासाठी निधी कुठून मिळणार ,स्वतंत्र पालिकेची वास्तू उभी करणार त्यासाठी निधी लागेल ,कर्मचारी भरती करावी लागेल या सर्व गोष्टीसाठी मोठा निधी लागणार असून तो कसा उभा करणार याचे उत्तर मिळाले पाहिजे.
गेल्या तीन वर्षांत रस्ते ,पाणी व इतर सुविधा आता सुरू झाल्या असून अमृत योजनेमार्फत पाणी पुरवठा योजना अंमलात आली की तो प्रश्न सुटणार आहे. नगरपालिकेची स्थापना झाली की या सुविधा मिळणार नाहीत म्हणून आमचा नगरपालिकेला विरोध असून काही बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या लाभासाठी नगरपालिकेची मागणी होत असून ज्यांना नगरअध्यक्ष व्हायचं आहे. तेच पाठपुरावा करत आहेत असा टोला त्यांनी दिला या सदर्भारत आचार संहिता संपली की पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्फत मुख्यमंत्र्याची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.

या संदर्भात शिवसेनेचे या भागातील स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांना विचारले असता त्यांनी बैठक झाल्याचे मान्य केले व नगरसेवकांना विकास हवा असल्याचे सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email