तरुणाला मारहाण – डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०४ – डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजेश विश्वकर्मा सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पिला गेट येथून घराकडे जात असतांना दोन अज्ञात इसम चेहऱ्यावर काळे कपडे बांधून आले. त्यांनी काही कारण नसताना विश्वकर्मा याच्या तोंडावर कपडा टाकून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. प्रकरणी विश्वकर्मा याने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून ता तक्रारी जुसार पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुंन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: