डोळखांब आरोग्य केंद्राची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
( श्रीराम कंदु )
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी आज शहापूर तालुक्यातील डोळखांब आरोग्य केंद्राला भेट देवून संपूर्ण आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच आरोग्य केंद्रात असणाऱ्या रुग्णाची , गरोदर मातांची विचारपूस करून आरोग्य केंद्राचा अहवाल तपासला व उपलब्ध औषधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी) चंद्रकांत पवार उपस्थित होते.
या दौऱ्यात त्यांनी साकडबाव उपकेंद्राला भेट देऊन शहापूरच्या काही गाव-पाड्यांना भेटी दिल्या आणि गावातील आवश्क सोई-सुविधा , योजनाबाबत गावकर्यांशी संवाद साधला तसेच गावकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुलांची पाहणीही केली.शिवाय जिल्हा परिषद देवगाव शाळा आणि पारधवाडी शाळांना भेटी देवून विद्यार्थांशी मनमोकळा संवाद साधला.