डोबिवलीत जमिनीच्या वादातून दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला, १० जणाविरोधात गुन्हा
(श्रीराम कांदु)
जमिनीच्या वादातून १० जणांनी दाम्पत्यावर घरात घुसुन सशस्त्र हल्ला केला असून सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या पुतण्यालाहि जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथे घडली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून ज्ञानेश्वर भोईर,विजय भोईर,अजय भोईर,वैभव भोईर,रामा भोईर,सदाशिव भोईर,किरण भोईर, संजय श्रीराम भोईर , सुभाष भोईर ,राजू भोईर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजु भोईर याला अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव रागाई मंदिरा नजीक राहणारे नाना पाटील ( ५० ) हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.पाटील यांच्या जमीनीचे वाद सुरू आहेत .या वादातून दुपारी दीड वाजण्याच्या सूमारास ज्ञानेश्वर भोईर,विजय भोईर,अजय भोईर,वैभव भोईर,रामा भोईर,सदाशिव भोईर,किरण भोईर,,सुभाष भोईर , संजय श्रीराम भोईर , राजू भोईर हे दहा जण चोपर , लाठ्या – काठ्या,लोखंडी रॉड, स्टॅम्प घेऊन त्यांच्या घरात घुसले. त्यांनी नाना पाटील यांच्यावर वार करत त्यांना जबर मारहाण केली. यावेळी पाटील यांच्या पत्नीलाही त्यांनाही धक्काबुक्की केली. तर पाटील यांचा पुतण्या कल्पेश सोडवण्यासाठी आला असता त्याला ही बेंदम मारहाण करत या दहा जणांनी तेथून पळ काढला .या प्रकरणी विष्णूं नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात अली असून या तक्रारी नुसार पोलिसानी गुन्हा दाखल राजू भोईरला अटक उर्वरित फरार आरोपींचा तपास सुरू केला आहे . नाना पाटील आणि पुतण्या कल्पेश यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Please follow and like us: