डोंबिवली स्टेशन परिसर सुधारणा ” करण्यासाठी विभागीय कार्यालयाचे स्थलांतर
डोंबिवली दि.२७ – डोंबिवली शहरात होणारी वाहतूक कोंडी ,फेरीवाले आदी मुळे स्टेशन परिसरात कायम वाहनांची कोंडी होत असते हे लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेने “डोंबिवली स्टेशन परिसर सुधारणा “योजना आखण्याचे ठरवले असून यासाठी समंत्रक नेमण्यात आला आहे. त्याचा अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे दरम्यान पूर्वेची दोन प्रभाग कार्यालये इंदिरा चौकात एकाच इमारतीत असून ती त्या त्या प्रभागात हलवण्यात येणार आहे व तशा हालचाली सुरू आहेत.
हेही वाचा :- डोंबिवली निवासी भागात डेंग्यू झालेले चार ते पाच रुग्ण आढळले
पूर्वेला ‘ग ‘आणि ‘फ ‘ही दोन प्रभाग कार्यालये एकाच इमारतीत आहेत पण विभागीय कार्यालयाची इमारत जुनी झाली आहे, दोन कार्यालयांना जागा कमी पडत आहे, भीतीना वाळवी लागल्याने फाईली, कागदपत्र खराब होत आहेत म्हणून ही दोन्ही कार्यालये हलवली जात आहेत ‘ग ‘प्रभाग कार्यालय सुनील नगर येथील महिला बचत गटाच्या इमारतीत तर ‘फ ‘प्रभाग कार्यालय पी पी चेंबर्स इमारतीमध्ये हलवण्यात येणार आहे. “डोंबिवली स्टेशन परिसर सुधारणा “योजना महत्वाकांक्षी असून सुशोभीकरण करण्यासंदर्भात समंत्रक नेमण्यात आला आहे त्यांच्या अहवालाची वाट पाहिली जात आहे.
स्टेशन परिसर सुधारणा योजनेत स्टेशन पासून अर्धा ते एक कि मी अंतरावर रस्ते ,वाहनांचे पार्किंग ,भाजी मार्केट आदी सुविधा कशा देण्यात येतील या बाबत सूचना असणार आहेत विभागीय कार्यालयाच्या जागेत पार्किंग व्यवस्था व कमर्शिअल कार्यालये यांना जागा देण्यासंदर्भात विचार केला जाणार आहे. या संदर्भात शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी योजनेचा विचार करण्यात येत असल्याचे मान्य केले सध्या हे सर्व प्राथमिक स्तरावर असून अहवाल आल्यावर कशा प्रकारे काम करता येईल, निधी याबद्दल स्थायी समितीत निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.