डोंबिवली स्टेशनसमोरील दुभाजकावर कार चढली
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन समोरील तृप्ती हॉटेल जवळील दुभाजकावर एक कार चढली.ही घटना गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली. सुदैवाने कारचालक आणि कार मधील कुटुंबायांना दुखापत झाली नाही.१५ दिवसातील ही तिसरी घटना आहे.त्यामुळे हा दुभाजक वाहनचालकांसाठी यमदूत बनला आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील एका कुटुंबाने मुंबईला एअरपोर्टला जाण्यासाठी व्होलो कार बुक केली होती.कारच्या मागच्या सीटवर तीन जण तर पुढे कारचालक होते.या रस्तावर आल्यानंतर कारचालकास दुभाजक असल्याचा अंदाज न आल्याने कार दुभाजकावर चढली.सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.पोलीस मित्र हेमंत दाभोळकर आणि काही नागरिकांनी सदर कार दुभाजकावरून खाली उतरवली.नागरिकांनी मदत केल्याने कारमधील कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.कारचे फारसे नुकसान झाले नाही.काही वेळानवं कारचालक चार घेईन निघून गेला.या महिन्यातील ही तिसरी घटना असून यापूर्वी एक रिक्षा अश्याच प्रकारे दुभाजकावर चढली होती. येथील या दुभाजकामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
Please follow and like us: