डोंबिवलीत सात वर्षीय चिमुकल्याचा मूत्यू प्रकरण मेडिकल अहवालानंतर धक्कादायक खुलासा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०५ – दीड महिन्या पूर्वी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झालेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह घरानजीक असलेल्या एका ड्रेनेजच्या टाकीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टराना या चिमुरड्यावर अत्याचार झाल्याचा संशय आल्याने उत्तरीय तपासनीसाठी सदर मृतदेह मुंबईला पाठवला होता अखेर याबाबत मेडिकल अहवाल आला असून धक्कादायक खुलासा झाला आहे. सैतानी वासनांध नराधमनी या चिमुकल्याचे अपहरण करत त्याला गुंगीचे औषध पाजून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत ,अत्याचार नंतर हत्येच्या उद्देशाने त्याला ड्रेनेजच्या टाकीत फेकून दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दखल करण्यात आल आहे.
डोंबिवली देसलेपाडा येथे राहनारा अथर्व वारंग या सात वर्षीय चिमुकला २४ मे रोजी खेळता खेळता घराबाहेरून बेपत्ता झाला होता. २५ मे रोजी या मुलाचा मृतदेह जवळच्या ड्रेनेजच्या नाल्यात सापडला होता. मात्र तपासणी अंती डॉक्टराना अथर्व वर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आल्याने त्याचा मृतदेह तपासणीसाठी जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला होता. जे जे रुग्णालयातील डॉक्टरानी देखील असाच संशय व्यक्त केल्याने मृतदेहाचे अवशेष केमिकल अनालिसिस साठी धाडण्यात आले होते. मानपाडा पोलिसानी अथर्वच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करत सदर ड्रेनेज च्या टाकीला झाकण नसल्याने त्याचा मृतदेह त्याची हत्या करुन फेकून देण्यात आला होता की, अथर्व त्यात पडून त्याचा मृत्यू झाला होता ,की त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत त्याचा मृतदेह ड्रेनेजच्या टाकीत फेकून दिले याबाबत विविध तर्क लावत विविध अंगाने पोलिसांनी तपास सुरू केला .काही संशयितांना पोलिसानी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली.याच दरम्यान अथर्व च्या आरोपीना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी ज्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत मृतदेह आढळून आला त्या इमारतीच्या सय्यद हसन अहमद, मोनिस अहमद, अैमान खान, नागेंद्र सिंग आणि विशाल सिंग या पाच बिल्डर विरोधात इमारत बांधकाना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत या पाचही बिल्डरांना मानपाडा पोलिसानी अटक केली. मात्र मेडिकल अहवाल प्राप्त न झाल्याने पोलिस हत्येचे खरे कारण शोधू शकलेले नव्हते अखेर मेडिकल अहवाल प्राप्त झाला असून या सात वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करत त्याला गुंगीचे औषध देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत त्याच्या हत्येच्या उद्देशाने त्याला नजीक च्या इमारतीच्या द्रेनेच्या टाकीत टाकल्याचे उघड झाले आहे. या टाकीत गुदमरून या चिमुकल्याचा अंत झाला असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. असे सैतानी कृत्य करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करून त्यांच्या वर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.