डोंबिवली ; रस्ते खोदाई खर्च कमी केला तरीही महावितरणला अमान्य…

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२३ – कल्याण – डोंबिवलीत महावितरण कपंनीच्या भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभेने ७००६ रुपये वरुन ३५०० रुपये केले असले तरी हे दर कंपनीने सुचवलेल्या २३५० रुपये प्रित रनिंग पेक्षा जास्त असल्याने महावितरण कंपनीने नाराजी दर्शवली आहे. आमच्या बजेटपेक्षा पाच पट दर जास्त असल्याने वरिष्ठांकडे दाद मागणार आहे असे महावितरण कपंनीच्या सूत्रांनी सांगीतले.

कल्याण डोंबिवली शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी १६८.५ कि मी रस्ते खोदण्यासाठी महावितरण कंपनीने परवानगी मागीतली होती मात्र महापालिकेने ७००६ रुपये प्रित रनिंग मीटर रस्ते दुरुस्ती शुल्क आकारले होते ही रक्कम अन्य महापालिकांच्या मानाने खूपच जास्त असल्याने महावितरण कपंनीने शुल्क कमी करण्याची विनंती केली. पण नगरसेवकांनी दर कमी करण्यासाठी विरोध केला. महावितरण कंपनी चार फुट खोल वाहिन्या टाकणे अपेक्षित असताना जमिनीवरच त्या टाकण्यात येतात. शिवाय पाण्याच्या पाईपलाईनजवळ टाकण्यात येतात, पालिकेच्या स्वच्छतागृहाला व्यापारी दराने वीजदर आकारले जातात असे आक्षेप नोंदवत विरोध करण्यात आला अखेर महापौर विनिता राणे यांनी ३५०० रुपये रस्ता दुरुस्तीशुल्क आकारण्याचा व आगाऊ पैसे जमा करण्यास मान्यता दिली.

महावितरण कंपनीच्या अधिका-यानी दिलेल्या माहितीनुसार केंद्र व राज्य शासनाचा निधी खोदाई खर्च २,३५० मंजूर केला आहे मात्र महासभेने हा दर ३५०० रुपये म्हणजे १००० रुपये जास्त मंजूर केले असल्याने हे दरही परवडणारे नाहीत असे सांगण्यात आले. आमच्या बजेटपेक्षा खोदाई दर जास्त असल्याने निधी परत पाठवला जाईल असेही त्या सूत्रांनी सांगितले. कल्याण एकात्मिक उर्जा अधिक्षक अभियंता प्रवीण परदेशी कल्याण डोंबिवली महापालिकेने जरी दर कमी केले असले तरी शासनाने जेर निश्चित केले त्यापेक्षा हे दर १००० रुपयानी जास्त आहेत. म्हणजे पाच पट जास्त असून महावितरक कंपनीच्या आर्थिक निधीतून हा खर्च केला जातो. हा दर परवडणारा नसल्याने मुख्यालयाकडे पाठवला जाईल व महापालिकेला पुन्हा दर कमी करण्यासाठी विनंती करण्यात येईल असे कल्याण एकात्मिक उर्जा अधिक्षक अभियंता प्रवीण परदेशी यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email