डोंबिवली ; रस्ता रुंदीकरणासाठी एन दिवाळीत त्या इमारतीवर कारवाई होणार ?

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२७ – रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेने केलेल्या सर्वेत बाधित झालेली डोंबिवली पूर्वेकडील संगीतावाडी येथील जैन मंदिर ते नेरुरकर रस्तावरील किशोर निवास इमारतीवर हतोडा पडणार आहे. पागडी पद्धतीच्या या इमारतीतीत राहणाऱ्या ५६ कुटुंबियांना एन दिवाळीत बेघर होऊ का अशी भीती वाटत आहे. त्यामुळे येथील रहिवाशी आणि महिलावर्गानी शुक्रवारी सकाळी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी रहिवाश्यांनी `ग` प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांची भेट घेतली. मात्र कारवाई होणारच असे कुमावत यांनी रहिवाश्यांना सांगितल्याने महिलांच्या डोळ्यातून अश्रू आले.यावर तोडगा काढण्यासाठी रहिवाशी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेणार आहेत.

४० वर्ष जुनी असलेल्या या इमारतीचे मालक किशोर भगत असून आता या इमारीतीतील कुटुंब कुठे राहण्यास जाणार ? विकासाला आमचा विरोध नाही परंतु आधी आमचे पुर्नवसन करा, त्यानंतर इमारतीवर कारवाई करा असे रहिवाशी प्रसाद सावंत यांनी सांगितले. शासनाने ३ सप्टेंबर २००५ रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर केला. त्यानुसार संगीतावाडी येथील जैन मंदिर ते नेरुरकर रस्त्यापर्यत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे.

रहिवाश्यांचा पालिकेवर मोर्चा

रस्ता रुंदीकरणात सदर इमारत येत असल्याने पालिकेने इमारतीचे मालक किशोर भगत यांना ४ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली होती. सदरचे बांधकाम पडून सदर जागा रस्त्यासाठी का घेण्यात येऊ नये ? याबाबतचा लेखी खुलासा २६ ऑक्टोबर रोजी द्यावा असे नोटीस मध्ये लिहिले आहे.त्यानुसार शुक्रवारी इमारत मालक भगत यांनी कुमावत यांची भेट घेतली. यावेळी इमारतीचे रहिवाशी यांनीही कुमावत यांची भेट घेऊन आम्हास बेघर करू नका अशी विनंती केली. एन दिवाळीत सदर इमारतीवर कारवाई झाल्यास येथील रहिवाश्यांचा संसार उघड्यावर पडणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email