डोंबिवली ; बावन चाळ गणेश मंदिर जवळ असलेल्या बस थाब्याजवळ कचरा ढीग ,विद्यार्थी त्रस्त

डोंबिवली दि.०१ – पश्चिम डोंबिवलीतील गणेश नगर ,राजू नगर ,बावन चाळ भागातील सुमारे 150 ते 200 नागरिक आपल्या मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी बस थाब्यावर उभे असतात मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे साठलेले असतात याचा मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही अशी तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे.

जागृती प्रतिष्टान व जनहित प्रतिष्टान यांनी या बाबतची तकार शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचेकडे केली आहे

तसेच गणेश मंदिर ज्या बावन चाळ भागात आहे तेथून रस्ता वळणाचा केला तो सरळ केला असता तर वाहतुक कोंडी झाली नसती शिवाय बावन चाळ ठाकुर्ली स्टेशन ते नवीन पूल जाण्यासाठी रस्ता नाही तेथे भला मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साठल्याने चिखल झाला आहे स्थानिक शिवसेना नगरसेवक जनार्दन म्हात्रे व रेखा म्हात्रे याचेकडेही तकार करण्यात आली असून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे पूर्वेला जाण्यासाठी मोठा पूल बाधण्यात आला असला तरी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते येथील प्रश्नाकडे लक्ष देण्याची विनंती संस्थेचे अध्यक्ष महेश काळे व एकनाथ वानखेडे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.