डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा येथे घरफोडी
कल्याण दि.२३ – डोंबिवली पूर्वेकडील येथील आशीर्वाद बंगला येथे राह्णार संतोष म्हात्रे हे काहीकामानिमत्त शनिवारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने असा मिळून १ लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल लंपास केला काल सकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलीसनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: