डोंबिवली पश्चिम भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पवन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

( श्रीराम कांदु )
कल्याण डोंबिवली भागात विकासाच्या कामात दुर्लक्ष होत आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे होणे गरजेचे आहे. राज्यात असलेल्या किंवा राज्याच्या आसपास असलेल्या प्रादेशिक पक्षाच्या धोरणामुळे विकासाला खिळ बसत आहे असे  राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत सांगितले.
 कोपर स्टेशन  येथील डोंबिवली पश्चिम  भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पवन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन  राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी भाजप ग्रामीणचे अध्यक्ष व नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेवक भास्कर जोशी, भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष संजीव बिडवाडकर, जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, खोणीचे सरपंच हनुमान ठोंबरे, नगरसेवक विशू पेडणेकर, राजन आभाळे ,संदीप पुराणिक, रविना माळी आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार व राज्यात देवेंद्र फडणवीस चांगल्या प्रकारे काम करीत आहे. एका विचारसरणीचे सरकार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या वा इतर कुठल्याहि निवडणुका असोत भाजपाचा उमेदवार जिंकून आला पाहिजे.पारदर्शी कारभार अत्यंत महत्वाचा आहे.केंद्रातून  किंवा राज्यातील आलेले पैसे असतील तर पैसे चांगल्या कामासाठी वापरणे गरजेचे आहे. कल्याण डोंबिवली भागात विकासाच्या कामात दुर्लक्ष होत आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे होणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री फडणवीस निधी देतीलच ईथे मेट्रो येणारच आहे. रस्ते होणारच आहेत. परंतु या सर्व योजना केंद्रातल्या नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस सरकार मुळे होत आहेत. विकास म्हणजे भाजप. राज्यात असलेल्या किंवा राज्याच्या आसपास असलेल्या प्रादेशिक पक्षाच्या धोरणामुळे विकासाला खिळ बसत आहे.ग्रामपंचायतीची किंवा कोणतीही निवडणूक असो शतप्रतिशत भाजप होण्याची गरज आहे. शतप्रतिशत भाजपच्या दिशेने जाणे याचा  अर्थ काय तर सशक्त भारत घडविणे आणि सशक्त भारत घडवायचा असेल तर सशक्त भारत घडविणे गरजेचे आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना बाबतीत जनतेला माहिती देणे  किंवा स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी पवन पाटील यांची आहे. हे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी उघडून पवन पाटील वत्यांच्या कार्यकर्ते यांनी  योग्य दिशेने पाउल टाकले आहे असे  राज्यमंत्री   चव्हाण यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री यांनी पवन पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

Hits: 258

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email