डोंबिवली पश्चिमेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
(श्रीराम कांदु)
कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली पश्चिमेला सिमेंट कॉक्रीटकरणाचे काम जोरात सुरू आहे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रस्ता जेसीबीने खणत असताना भूमिगत असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला धक्का बसला व पाईप लाईन फुटली त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले
पश्चिम डोंबिवली भागात पाणी पुरवठा करणारी 200 मीमी व्यासाची ही पाईप लाईन असून हे वृत्त समजताच पाणी पुरवठा
करणारे पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे मात्र यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून काही भागात आज पाणी पुरवठा होण्याची चिन्हे नाहीत
डोंबिवली पश्चिमेला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन मुख्य असून 400 मीमी व्यासाची असून पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी काम चालू होते जेसीबीच्या धक्क्याने पाईपला मोठे होल पडले असून पश्चिम डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले
Please follow and like us: