डोंबिवली – पनवेल परिवहन बस सेवा सुरु
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – गेल्या २ वर्षापासून बंद असलेली डोंबिवली –पनवेल परिवहन बससेवा शुक्रवारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आली.परिवहन समिती सभापती संजय पावशे आणि सदस्यांनी यांनी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात ही सेवा सुरु केल्याने प्रवाशांनी त्यांचे आभार मानले. मात्र या ठिकाणाला रिक्षांनी विळखा घातल्याने वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग हे ठिकाण रिक्षांच्या त्रासापासून मुक्त करतील का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
डोंबिवली-पनवेल रेल्वे स्थानक सकाळी ८ , ९ , ११.३० , दुपारी १२.३५, सायंकाळी ४. २०, ५.२० आणि रात्री ८. ५५ मिनिटांनी तर पनवेल-डोंबिवली रेल्वे स्थानक सकाळी ९.३५ , १०.३५ दुपारी १.१० , २.१० , सांयकाळी ४.५५, ६.५५ रात्री ९.३० आणि १०.३० मिनिटांनी अशी वेळ आहे. या बस सेवेचे ३५ रुपये भाडे आहे. डोंबिवली स्टेशन –चार रस्ता ,गावदेवी मंदिर , शिवाजी उद्योग , स्टार कॉलनी , सागाव , पिंपळेश्वर मंदिर , पाईपलाईन, काटई, लोढा, देसाई , म्हात्रेवाडी , उत्तरशिव फाटा, दहिसर मोरी, तळोजा रेल्वे स्थानक , नावडे फाटा , कळंबोली कॉलीनी,आसूड गाव त्यानंतर पवनेल रेल्वे स्थानक असी मार्गिका आहे. शुक्रवारी ही बससेवा सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी परिवहन समितीचे आभार मानले. मात्र ही सेवा कायम सुरु राहिली पाहिजे असे सांगताना येथील रस्ता रिक्षामुक्त करा असे परिवहन समिती सभापती संजय पावशे यांना विनंती केली. मात्र वाहतूक पोलीस येथील रिक्षाचालकांवर कारवाई करीत नसल्याचा आरोप लालबावटा रिक्षाचालक- मालक संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी केला आहे. तर वाहतूक पोलीस संख्या कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस उभे करणे शक्य नाही. तरीही इंदिरा चौकात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होत असते.