डोंबिवली पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी प्रथमच महिला पत्रकार जान्हवी मोर्ये यांची निवड

डोंबिवली पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी प्रथमच महिला पत्रकार जान्हवी मोर्ये यांची निवड
डोंबिवली-डोंबिवलीत सर्वात जुना व विश्वास संपादन केलेल्या डोंबिवली पत्रकार संघाची बुधवारी सभा घेण्यात आली याय पत्रकार संघाच्या सदस्या जान्हवी मोर्ये (लोकमत)यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात महिला पत्रकारकडे अध्यक्षपद सोपविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे जाणकार सांगतात
संघाच्या आज झालेल्या सभेत कार्याध्यक्ष म्हणून श्रीराम कांदु (वृत्तमानस) उपाध्यक्षपदी शंकर जाधव (नवशक्ती ,सागर , महाराष्ट्र दिनमान , मुंबई मित्र ) सचिव मुरलीधर भवार (लोकमत)व खजिनदार म्हणून प्रशांत जोशी (ठाणे वैभव ,नवराष्ट्र)यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.मावळते अध्यक्ष आकाश गायकवाड (नवाकाळ ) यांनी वरील पदाधिकार्याची नावे जाहीर केली.येत्या वर्षात डोंबिवलीतील विविध प्रश्न व सामाजिक ,सांस्कृतिक ,शैक्षणिक प्रश्न एकजुटीने सोडवण्याचा मनोदय अध्यक्ष जान्हवी मोर्ये यांनी व्यक्त केला .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email