डोंबिवली ; पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याला बेड्या
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.११ – पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत मोरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत.प्रशांत मोरे यांचं २०१५ साली डोंबिवलीच्या स्नेहा शिंदे यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र त्यानंतर सतत काही ना काही कारणावरून ते आपला छळ करत होते, तसंच आपले अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी देत होते, असा त्यांच्या पत्नीचा आरोप आहे. याबाबत पत्नीच्या तक्रारीनुसार डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा:- कल्याण डोंबिवली मध्ये चोरटयांचा धुमाकूळ
यानंतर प्रशांत मोरे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं अखेर पोलिसांनी त्यांना पुण्याच्या सैन्यतळावरून अटक केली. त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. प्रशांत याला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान, मोरे यांची आजवर जिथे जिथे पोस्टिंग झाली, तिथे तिथे त्यांनी अनेक महिलांना नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. याबाबत रामनगर पोलीस सध्या कसून तपास करत आहे. याबाबत स्नेहा मोरे यांना विचारलं असता, आपल्याला आपल्या पतीची दुष्कृत्य समोर आणायची असल्यानं हे पाऊल उचलले. तर सैन्याचं नाव आपल्याला खराब करायचं नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. अधिक बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
हेही वाचा:- डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसारत रोकड लंपास